अंबाजोगाई येथील उदयोन्मुख पत्रकार वैभव चौसाळकर यांचा तुळजापूर येथे विशेष सत्कार
"जय जगदंब" कॉफी टेबल प्रकाशना मध्ये


*तुळजापूरात ‘जय जगदंब’ कॉफीटेबल बुक प्रकाशन सोहळा; उदयोन्मुख पत्रकार वैभव चौसाळकर यांचा विशेष सत्कार*
*अंबाजोगाई (प्रतिनिधी)
तुळजाभवानी नगरीत आयोजित भव्य सोहळ्यात तुळजाभवानी संस्थानचे विश्वस्त बाळासाहेब दीक्षित लिखित ‘जय जगदंब’ या कॉफीटेबल बुकचे शानदार प्रकाशन पार पडले. या कार्यक्रमात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
या विशेष प्रसंगी माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या वतीने उदयोन्मुख पत्रकार श्री वैभव विजयकुमार चौसाळकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण आणि तुळजापूरचे विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते चौसाळकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या वैभव चौसाळकर यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या गौरवामुळे तरुण पत्रकारांना प्रेरणा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी ‘जय जगदंब’ या ग्रंथाच्या माध्यमातून तुळजाभवानीच्या इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रभावी चित्रण करण्यात आल्याचे नमूद केले.
दरम्यान, वैभव चौसाळकर यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.*






