
बीड (प्रतिनिधी) कामगाराला बॅटने मारहाण केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेला सतीश उर्फ खोक्या भाई याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
खोक्यावर गुन्हा दाखल होताच तो अनेक दिवस फरार होता परंतु त्याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून आरोपांचे राजकीय वादळ उठले होते.त्याच्यावर एका बड्या नेत्याचा आशीर्वाद असल्याचा आरोप विरोधक करत होते.पोलिसांनी त्याला कारागृह बाहेर जेवण देताना व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीस देखील निलंबित करण्यात आले होते.
अनेक महिन्यापासून कारागृहात असलेल्या खोक्या भाईची काल निर्दोष सुटका करण्यात आल्याने मित्रपरिवार भेटण्यासाठी एकत्र येत रिल्स व्हिडीओ करत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.
सुटकेनंतर कारागृहाबाहेर त्याच्या मित्रपरिवाराने मोठा जल्लोष साजरा केला. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शहरात त्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, संबंधित प्रकरणात न्यायालयाने पुराव्याअभावी खोक्या भाई याची निर्दोष मुक्तता केल्याची माहिती समोर येत आहे. या निर्णयामुळे एकीकडे त्याच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असून दुसरीकडे नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.






