ब्रेकिंग न्यूज

शॉक लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू.

शिवणी गावावर शोककळा.

 बीड(प्रतिनिधी)बीड तालुक्यातील शिवणी येथील तुळशीराम (मुकेश) प्रभाळे (वय३२वर्ष ) यांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अत्यंत गरीब परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा हा तरुण एच.पी. गॅस एजन्सीत गॅस टाक्या वितरणाचे काम करत होता, तसेच घरगुती पिठाची गिरणीही चालवत होता.

दिनांक 31 मार्च मंगळवार रोजी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान घरा मध्ये बोर्ड दुरुस्त करत असताना अचानक विद्युत प्रवाह आल्याने त्याला विजेचा तीव्र शॉक लागून कोसळला.

विजेचा करंट लागल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला शिवणीहून बीड येथील शासकीय हॉस्पिटलकडे नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

आई-वडील, तीन मुली, एक मुलगा आणि मोठा भाऊ असा परिवार असलेल्या मुकेशच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button