ब्रेकिंग न्यूज

मोक्का व चेनस्नॅचिंग प्रकरणातील फरार आरोपींना ठोकल्या बेड्या.

दोन सराईत गुन्हेगार ताब्यात,तीन लाखांचा मुद्देमाल जप्त.स्थानिक गुन्हे शाखेची दबंग कारवाई.

बीड जिल्ह्यातील धारूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चेनस्नॅचिंग प्रकरणातील फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक करत धडक कारवाई केली आहे. तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत परळी येथील ईराणी वस्तीत पहाटे कोम्बिंग ऑपरेशन राबवले.

दि. २८ मार्च २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत कंबर उर्फ डंम्बर शहाजहान ईराणी (वय ४५) व हसनैन बरकतअली मिर्झा बेग उर्फ ईराणी (वय २०) या दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे आरोपी परळीतील ईराणी गल्ली परिसरात राहत असल्याचे निष्पन्न झाले होते.

आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी धारूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यासह आष्टी व शिवाजीनगर पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी एक अशा एकूण तीन गुन्ह्यांची कबुली दिली. विशेष म्हणजे आरोपींपैकी एक जण ठाणे जिल्ह्यातील मोक्का (MCOCA) गुन्ह्यात फरार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या कारवाईदरम्यान आरोपींकडून सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या चौकशीतून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी धारूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहा. पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि शिवाजी बंटेवाड, पोनि धनजंय ढोणे (प्रभारी संभाजीनगर परळी), पोउपनि श्रीराम खटावकर, सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारूती कांबळे, सचिन सानप, रामचंद्र केकान, गोविंद भताने, आनंद मस्के, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, राहुल शिंदे, गोविंद राख, विकास राठोड, स्वाती मुंडे व पोलीस अंमलदार सचिन आंधळे, अर्जन यादव, अलीम शेख, बिभीषण चव्हाण, विकी सुरवसे व चापोह नितीन वडमारे, अतुल हराळे, सिध्देश्वर मांजरे असेंनी संयुक्त केलेली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button