ब्रेकिंग न्यूज

कर्जाच्या हप्त्याच्या वादातून तरुणाला जातीवाचक शिवीगाळ.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल;आंबेडकर अनुयायी आक्रमक.

बीड (प्रतिनिधी) कर्जाच्या हप्त्याच्या वसुलीसाठी फोन केल्याने एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन समाधान कोरडे (वय 19, रा. मोची पिंपळगाव, ता. जि. बीड) हा युवक खाजगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. कोरडे एका फायनान्स कंपनीमध्ये कर्ज वसुलीचे काम करत आहे. संबंधित कंपनीकडून दीपक नानासाहेब मुंडे यांनी वैयक्तिक कर्ज घेतले होते. त्या कर्जाचा हप्ता भरण्यासंदर्भात आर्यन यांनी दि. 28 मार्च रोजी दुपारी फोन करून संपर्क साधला.

यावेळी संबंधित व्यक्तीने हप्ता भरल्याचे सांगितले. मात्र, हप्ता न भरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आर्यन यांनी त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर तपशील पाठविण्यास सांगितले. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवरील प्रोफाइल फोटोमध्ये Dr. Babasaheb Ambedkar यांचा फोटो पाहून संबंधिताने आक्षेपार्ह व जातीवाचक शब्दांचा वापर करत शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे करत आर्यन कोरडे यांनी दीपक नानासाहेब मुंडे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी अजय सरवदे, ॲड.धम्मानंद वाघमारे, प्रेम कांबळे, प्रवक्ता लोकशाहीचे संपादक नितीन मुजमुले, आकाश जावळे,नगरसेवक भारत कांबळे,फिर्यादी आर्यन कोरडे,लखन जोगदंड,मिलिंद सरपते, सुमेध सरवदे,अमर गायकवाड,पंकज सांवत यांच्या सह पंचशील नगर भागातील असंख्य भीमसैनिक देखील ताकतीने उपस्थित होते.

पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button