ब्रेकिंग न्यूज

बीड मध्ये गुटखा तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई.

५.९० लाखांचा मुद्देमाल जप्त,एक आरोपी ताब्यात.

बीड (प्रतिनिधी) राज्य सरकारने गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थावर विक्री व वाहतूक करण्यास बंदी असताना देखील बीडमध्ये मात्र खुलेआम गुटखा विक्री केली जात असल्याचे चित्र दिसत आहे याकडे अन्न व औषधं प्रशासन तसेच स्थानिक पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.

दिनांक 26 गुरुवार रोजी बीड शहरातील बालेपीर भागात गुटखा विक्रीसाठी नेत असताना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई करत एक इसम व कारसह सुमारे ५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध गुटखा तस्करीला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचून ही कारवाई केली. संशयित इसम गुटखा विक्रीसाठी माल घेऊन जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. कारची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गुटखा साठा आढळून आला.

या प्रकरणी पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत असून संबंधित इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई नवनीत कॉवत पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बंटेवार यांच्या मआदेशाने पीएसआय खटावकर व त्यांच्या पथकातील कर्मचारी सोमनाथ गायकवाड, अंकुश वरपे,गोविंद राख, बबन सलगर,अर्जुन यादव,अशपाक सय्यद, मनोज परजने, चालक नितीन वडमारे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली असून गुटखा तसेच इतर अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button