ब्रेकिंग न्यूज

धक्कादायक ! किट घेण्यासाठी गेलेली महिला कामगार बोगद्यात पडून गंभीर जखमी.

बांधकाम कामगारांची सुरक्षा रामभरोसे ! महिलेची प्रकृती चिंताजनक.

बीड (प्रतिनिधी)बीड बांधकाम कामगारांसाठी साहित्य वाटप सुरू असताना एका महिला कामगाराचा बोगद्यात पडून गंभीर अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

 अलका शिंदे (वय ३५, रा. मातोरी) असे जखमी महिलेचे नाव असून त्यांची प्रकृती चिंताजनक असून बीड शहरातील खाजगी दवाखान्यात त्यानच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पात्र बांधकाम कामगार यांना गृह उपयोगी साहित्य भांडी व इतर वस्तू वाटप केल्या जात आहे. यामुळे जिल्ह्यातील बांधकाम कामगार हे सकाळपासूनच बीड शहरात दाखल होत साहित्य वाटप होत असलेल्या गोडाऊन समोर रांगा लावत आहेत.

 अलका शिंदे या सकाळी सुमारे ८:०० वाजता बांधकाम साहित्य (किट) घेण्यासाठी गोदामात आल्या होत्या. मात्र, लाईट नसल्यामुळे त्या दिवसभर थांबून सायंकाळी सुमारे ७:३० वाजेपर्यंत रांगेतच थांबल्या होत्या. बीड शहरातील बहिरवाडी भागातील या गोदामात कामगारांना भांडी, बॅग व इतर साहित्याचे किट वाटप सुरू होते.

दरम्यान, किट घेण्यासाठी गोदामात प्रवेश करत असताना अंधारामुळे पाय घसरून त्या स्लॅप मधील बोगद्यात पडल्या स्थानिक नागरिकांनी त्यांना जवळपास दहा फूट बोगद्यात उतरून वर काढले यावेळी त्या अत्यंत घाबरून बेशुद्ध पडल्या होत्या.या अपघातात गंभीर जखमी झाल्या असून तातडीने त्यांना उपचारासाठी बीड शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वास्तविक पाहता बांधकाम कामगार कार्यालयातील कर्मचारी किंवा सदरील गोडाऊन मालकाने त्या महिलेला उपचारासाठी दाखल करण्याची गरज होती परंतु कामगारांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र दिसले यामुळे कामगार वर्गात संताप व्यक्त होत आहे.

या घटनेमुळे गोदामातील सुरक्षेचा अभाव, अपुरी प्रकाशव्यवस्था आणि व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button