ब्रेकिंग न्यूज

वाळू माफियांचा निकाळजेवर जीवघेणा हल्ला.

निकाळजेवर तीक्ष्ण हत्याराने वार;आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील वाळूघातील वाळू उपसा वाहतूक करण्यास परवानगी दिल्याने जिल्ह्यातील वाळू वाहतूक सुरू आहे मात्र काही ठिकाणी वाळू विनापरवाना व चोरट्या मार्गाने देखील सुरू असल्याचे चित्र सध्या बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

गेवराई तालुक्यातील गुळज गावातुन अति वेगाने  टिप्परने वाळू होते यामुळे गावातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच अपघाताचे देखील धोका आहे.

 गुळज गावातील निकाळजे यांच्या घरासमोर   लहान मुले खेळत असल्यामुळे वाळू वाहतूक करणारी मोठी वाहने सावकाश चालवावीत, अशी विनंती केल्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी रमेश निकाळजे यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात निकाळजे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, निकाळजे यांनी आपल्या घरासमोर खेळणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहन सावकाश चालवण्यास सांगितले. मात्र “तू आम्हाला विचारणारा कोण?” असा दम देत संतप्त झालेल्या माफियांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात निकाळजे यांच्या शरीरावर खोल जखमा झाल्या असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच किसन तांगडे यांनी सहकाऱ्यांसह रुग्णालयात धाव घेत निकाळजे यांची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच त्यांच्या उपचाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश सोळुंके यांच्याशी चर्चा केली.

यानंतर तांगडे यांनी गेवराईचे पोलीस उपअधीक्षक अनिल कटके आणि चकलंबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांच्याशी संपर्क साधून आरोपींवर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली. कारवाईत विलंब झाल्यास युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या वेळी किसन तांगडे समवेत राहुल कांबळे, रामेश्वर खळगे, बंडू ठोंबरे, गणेश प्रधान, संदेश मस्के, विजय तांगडे, दिपक जावळे, अशोक निकाळजे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button