ब्रेकिंग न्यूज

नेकनूर पोलिसांची वाहनधारकांकडून पैसे वसुली?

पैसे घेताना मांजरसुंबा चौकातील व्हिडिओ व्हायरल.

 

बीड (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात नेकनूर पोलीसांवर वाहनधारकांकडून वसुली केल्याचे गंभीर आरोप समोर आले असून, मांजरसुंबा चौकातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस वाहनधारकांकडून थेट पैसे घेत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, नवनीत कॉवत यांनी बीड पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारी, अवैध धंदे आणि गुंड प्रवृत्तीवर आळा बसल्याचे चित्र दिसत असताना, या घटनेमुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नेकनूर पोलीसांकडून वाहनधारकांची सर्रास लूट होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. विशेषतः धुळे–सोलापूर आणि अहिल्यानगर–अहमदपूर राष्ट्रीय महामार्गांवर दंडाची अधिकृत पावती न देता वाहनधारकांकडून थेट पैसे घेतले जात असल्याची चर्चा रंगली होती.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत असून, आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करुन पैसे घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई का?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button