ब्रेकिंग न्यूज

डॉ.दिवाकर गुळजकर यांचे दुःखद निधन 

वैद्यकीय क्षेत्रासह बीड शहरात शोककळा.

बीड : शहरातील फिनिक्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिवाकर गुळजकर यांचे मंगळवार दि. १७ मार्च २०२६ रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रासह बीड शहरात शोककळा पसरली आहे.

डॉ. गुळजकर यांना वैद्यकीय क्षेत्रातील अनेक वर्षाचा अनुभव असल्याने रुग्णांचा कल होता. जिल्ह्यातील रुग्णांना उपचार करून दिल्यामुळे शहरात सर्वोतोपरिचित होते. त्यांनी अनेक गरजू रुग्णांना अल्प दरात तर काहींना मोफत उपचारही उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आपुलकी आणि आदराची भावना होती.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालळली. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय, नातेवाईक तसेच मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.

डॉ. गुळजकर यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ आणि सेवाभावी होता.

 डॉक्टर गुळजकर यांचा अंत्यविधी आज दिनांक 17 मार्च मंगळवार रोजी दुपारी अमरधाम, मोंढा रोड, बीड येथे होणार आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button