श्रीराम मंदिर अंबाजोगाई येथे “हिंदू संमेलन” संपन्न
विश्वहिंदू परिषद अध्यक्ष डॉ गोपाळराव चौसळकर यांची उपस्थिती

*श्रीराम मंदिर अंबाजोगाई येथे
“हिंदू संमेलन” संपन्न*
अंबाजोगाई- प्रतिनिधी:-
दि १६ मार्च रोजी अंबाजोगाई येथे भट गल्ली,चौभारा,जैन गल्ली, पाटिल गल्ली,, जिरेगल्ली,सातपुते गल्ली यासह
श्रीराम मंदीर अंबाजोगाई येथे हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले . या संमेलनाचे प्रास्ताविक विश्वहिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ गोपाळराव चौसळकर यांनी केले , याच बरोबर गदाधरबुआ रामदासी यांनी माहिती दिली,हिंदूं संमेलन का आवश्यक आहे.हिंदूंना एकत्र येण्याची काय गरज आहे,त्याच बरोबर हिंदूंच्या प्रत्येक घरातून चांगले संस्कार घडवावेत असे लातूर येथून आलेले श्री तोडकर यांनी सांगितले, मान्यवरांचे स्वागत कॅप्टन सुंदर खडके यांनी केले तर,श्रीकुलकर्णी सर यांनी अतिशय मधुर आवाजात पसायदान म्हणून केले. यावेळी राम घोडके यांनी प्रसाद व्यवस्था केली आणि “हिंदू जगरची १०० वर्षे”पुस्तके वाटप करण्यात आली. या कार्यक्रमात उल्हास पांडे,मुकुंद घाटे, प्रभाकर सेलमोकर,अनंतराव देशपांडे,भास्कर देशपांडे,अभय जोशी,तसेच विश्व हिंदू परिषद, विविध हिंदू संघटना, आणि मोठया प्रमाणात हिंदू बांधव- भगिनी यांची उपस्थिती होती.



