बार्शी नाका येथे दूध विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला.
बीड मध्ये पुन्हा गुंडाराज?हल्ल्यात डोक्याला गंभीर दुखापत.

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून दादागिरी, गुंडगिरी वाढली असून गुंडाना भय राहिले नसल्याचे दिसत आहे.बीड जिल्ह्यात शुल्लक कारणावरून आता मारामारी करत घातक शस्त्राने जीवघेणा हल्ला केला जात आहे यामुळे आता पोलिसांनी गुंडावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे तरच अश्या घटनाना आळा बसेल.
दिनांक 15 मार्च रविवार रोजी बीड शहरातील बार्शी नाका परिसरात रात्री दूध विक्रेत्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात दशरथ नारायण वायभट (वय ३६, रा. वायभटवाडी, ता. बीड) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याखाली व मानेवर खोल जखमा झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ वायभट हे रविवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास बीड शहरात दूध घालून परत वायभटवाडीकडे जात होते. यावेळी बार्शी नाका परिसरात अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवून धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याखाली व मानेवर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना ११ टाके पडले आहेत. तसेच हल्लेखोरांनी त्यांच्याकडील मोबाईल फोनही हिसकावून घेतल्याचे समोर आले आहे.
जखमी दशरथ वायभट यांच्यावर सध्या बीडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हल्ला कोणी व का केला यांचे कारण अद्याप समजले नसून हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरु केला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे व हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या घटनेमुळे बार्शी नाका परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस पुढील तपास पेठ बीड पोलीस करत आहेत.






