ब्रेकिंग न्यूज

बीडमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची मोठी तस्करी उघड.

२०० बॉक्स व ट्रकसह ५१.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त,उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

बीड (प्रतिनिधी)राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर-बीड रोडवरील चौसाळा शिवार परिसरात सापळा लावून गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची अवैध वाहतूक उघडकीस आणली. या कारवाईत ट्रकमधील चोर कप्यात लपवून ठेवलेले विविध ब्रँडचे तब्बल २०० बॉक्स विदेशी मद्य जप्त करण्यात आले असून ट्रकसह एकूण ५१ लाख ८८ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

दि. १२ मार्च २०२६ रोजी मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोलापूर-बीड रोडवर चौसाळा शिवार येथे सापळा रचला. यावेळी संशयित अशोक लेलँड कंपनीचा सहा चाकी ट्रक (क्र. MH 23 AU 7275) थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये बनविलेल्या चोर कप्यामध्ये लपवून ठेवलेले गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेले विदेशी मद्याचे २०० बॉक्स आढळून आले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई), ८०, ८१, ८३, ९० व १०३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मा.आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई राजेश देशमुख, संचालक दक्षता व अंमलबजावणी प्रसाद सुर्वे,उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क संभाजीनगर संगीता दरेकर तसेच अधीक्षक बीड विश्वजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सदर गुन्ह्याचा तपास निरीक्षक संजय कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक आर. बी. खाडगीर करत आहेत. या कारवाईत दुय्यम निरीक्षक तातळे, काळे, सहायक दुय्यम निरीक्षक शेख तसेच जवान काशिनाथ डुकरे, प्रशांत मस्के, अशोक नागरगोजे, आदित्य खोसे, वैभव कोकाट, सुशील ढोले, सोमनाथ इथापे, करण बोरुडे, एम.एम. शेख, निशा नलावडे, सपना सय्यद, रीबिका ढाळे, रागिणी मुंडे, फुलझळके यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सुरू आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button