ब्रेकिंग न्यूज

११२ वर कॉल करून तरुणाची आत्महत्या.

बीड मधील धक्कादायक घटना.

बीड (प्रतिनिधी)शहरातील तेलगाव नाका परिसरातील पापनेश्वर मंदिराजवळ गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. २८ वर्षीय शेख आदम शेख मेहमूद यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

मोहम्मदिया कॉलनी, बीड येथील रहिवासी असलेल्या शेख आदम यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पापनेश्वर मंदिराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा शेख आदम यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक तपासात आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही तसेच कोणतीही सुसाईड नोटही सापडलेली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button