ब्रेकिंग न्यूज

नगर रोडवर रिटायर फौजीचा राडा पहा !

चहाच्या गाड्याची तोडफोड करत चहाचा गाडा केला पलटी.

बीड (प्रतिनिधी): बीड शहरातील नगर रोड या मुख्य रस्त्यावर एका निवृत्त फौजीने गोंधळ घालत चहाचा गाडा पलटी केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नगर रोड परिसरात अनेक लहान व्यावसायिक चहाचे गाडे, बेकरी व दूध विक्रीचे छोटे स्टॉल लावून आपला उदरनिर्वाह करत असतात. दरम्यान, एका रिटायर फौजीने रस्त्यावर येत हे गाडे अतिक्रमण असल्याचे सांगत संताप व्यक्त केला. यावेळी त्याने चहाचा गाडा पलटी करत खुर्च्यांची तोडफोड केली.

या घटनेदरम्यान रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. गाडा पलटी झाल्याने दूध व इतर साहित्य रस्त्यावर सांडले, तर गॅस सिलेंडरही रस्त्यावर पडल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र चहाच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. या प्रकाराबाबत पोलीस प्रशासनाकडून पुढील कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button