पवनचक्कीवर दरोडा टाकणारी अट्टल टोळी जेरबंद.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन दरोडेखोर ताब्यात.

बीड(प्रतिनिधी) बीड पाटोदा तालुक्यातील येवलवाडी शिवारात पवनचक्कीवरील वॉचमनला मारहाण करून केबल व इतर साहित्य चोरणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तीन आरोपी अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटोदा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे येवलवाडी (ता. पाटोदा, जि. बीड) येथील शिवारात रिनिव्ह पॉवर कंपनीच्या पवनचक्कीवर वॉचमन म्हणून काम करणारे सौरभ बाबुराव येवले (वय 22) व त्यांचे सहकारी शुभम बबन सोंडगे यांना 25 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मारहाण केली. त्यानंतर पवनचक्कीमधील केबल व इतर साहित्य चोरी करून आरोपी फरार झाले. या घटनेप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक 54/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा बीड आणि पाटोदा पोलीस करीत असताना गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मधुकर आबा काळे (रा. खामकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव) व बबलू जालींधर शिंदे (रा. दसमेगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खामकरवाडी शिवारातील एका फटाक्याच्या कारखान्यावर छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी अनिल उर्फ शेड्या आबा काळे, शिवाजी संजय शिंदे (दोघे रा. खामकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव) आणि अमोल रमेश शिंदे (रा. येरमाळा, ता. कळंब, जि. धाराशिव) यांच्या साथीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरी केलेली केबल विकून त्यातून मिळालेले पैसे आपापसात वाटून घेतल्याचेही त्यांनी सांगितले. आरोपींकडून अंगझडतीत 20 हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.
ही करवाई मा. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत सो, मा. अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पहांडकरचे सो, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि श्रीराम खटावकर, सुशांत सुताळे, पोह/सोमनाथ गायकवाड, पोह/मारूती कांबळे, पोह/राहुलत्व, पोह/बाळु सानप, पोह/आनंद मसके, पोअ/अर्जुन यादव, पोअ/अर्जुन यादव, पोअ/अशपाक सय्यद, पोअ/मनोज चारे, केले अंजमा, केले.








