ब्रेकिंग न्यूज

मदनबाई लोढा यांचे संथारा व्रतामध्ये निधन.

प्रेमचंद, दिलीप, अशोक लोढा यांना मातृशोक.

बीड : माजी आमदार स्व. चांदमल लोढा यांच्या धर्मपत्नी श्रीमती मदनबाई चांदमल लोढा (वय ८९) यांना ३ मार्च मंगळवार रोजी रात्री साडेआठ वाजेदरम्यान संथारा व्रतामध्ये वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या पार्थिवावर ४ मार्च बुधवारी मोंढा रोडवरील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी 10:30 वाजता त्यांची डोली जालना रोडवरील गणेश हाउसिंग सोसायटीमधील अशोक लोढा यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे. 

दिवंगत मदनबाई लोढा यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी (पुष्पा संदीप भंडारी, पुणे), सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद (बाबुशेठ) लोढा, स्व. सतीश लोढा, दिलीपचंद लोढा, भाजपचे शहराध्यक्ष अशोक लोढा यांच्या त्या मातोश्री होत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button