GST अधिकारी प्रदीप फाटे पोलिसांच्या ताब्यात.
बीड स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून घेतले ताब्यात.

बीड : बीड येथील जीएसटी अधिकारी सचिन जाधव यांच्या आत्महत्याप्रकरणी फरार असलेला आरोपी प्रदीप फाटे याला बीड स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
गेल्या महिन्यात बीड-मांजरसुंबा रोडवरील कोळवाडी परिसरात दिनांक 17 जानेवारी रोजी सचिन जाधव यांनी आत्महत्या केली होती. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत प्रदीप फाटे हे जाणूनबुजून त्रास देत असल्याचा उल्लेख असल्याचे समोर आले होते. त्यानंतर जाधव यांच्या पत्नीने बीड ग्रामीण पोलीस ठाणे येथे प्रदीप फाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
बीड ग्रामीण पोलीस ठण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रदीप फाटे गेल्या महिनाभरापासून फरार होता. अखेर आज (दि. ३ मार्च) बीड स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यात शोधमोहीम राबवून त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याला बीड येथे आणण्यात येत असून पुढील चौकशी केली जाणार आहे.
ही कारवाई नवनीत कॉवत (पोलीस अधीक्षक), अप्पर पोलीस अधीक्षक सचिन, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या पथकाने केली.
या प्रकरणातील पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे.




