ब्रेकिंग न्यूज

गुटखा साठ्यावर छापा;३,५९,३८८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त.

बीड स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई.

बीड, दि. २८ (प्रतिनिधी): जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश नवनीत काँवत यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने पेठ परिसरात मोठी कारवाई केली. चांदणेवस्ती पेठ येथील पत्र्याच्या शेडवर छापा टाकून अंदाजे ३,५९,३८८ रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपन्यांचा गुटखा जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, चांदणेवस्ती येथील फेरोज दस्तगीर तांबोळी याने आपल्या घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवला आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशाने पथकाने दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.४५ वाजता छापा टाकला.

छापा टाकताच संशयित फेरोज तांबोळी हा पोलिसांना पाहून पसार झाला. मात्र त्याच्या घराशेजारील शेड व घरातून विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त करण्यात आला. जप्त मालाची एकूण किंमत अंदाजे ३,५९,३८८ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बीड नवनीत काँवत. अप्पर पोलिस अधीक्षक बीड, सचिन पांडकर, म्थानिक निरीक्षक अधिकारी पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, त्यांच्या पोउपनि श्रीराम खटावकर, पोह/राहुल, पोह/युनुस बाग, पोह/गोविंद राख, मपोह/स्वाती मुहूर्त, पोअ/अशपाक सय्यद, पोअ/अशपाक सय्यद पो.अ.मनोज/परजने यांनी केली आहे.सदर आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button