वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला; सर्वोच्च न्यायालयातही दिलासा नाहीच.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला मोठा धक्का !

बीड (प्रतिनिधी) – केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यापूर्वी बीड जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आरोपीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती; मात्र तेथेही दिलासा न मिळाल्याने वाल्मीक कराडला मोठा यांच्या जामिनीवर सुटकेमध्ये मोठी अडचण निर्माण झाले आहे.
या प्रकरणात वाल्मीक कराडसह इतर आरोपी सध्या बीड जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यात सरकारी पक्षाकडून ठोस पुरावे सादर करण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्याचे समजते आहे.
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. तसेच बीड येथील अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनीही काम पाहिले. सरकारी पक्षाने आरोपीविरुद्ध सादर केलेल्या सबळ पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष लागले असून पुढील सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.










