पर्यावरण संरक्षण हि काळाची गरज-सुधाकर देशमुख वृक्षमित्र.
१ दिवसीय पर्यावरण कार्यशाळा .

पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज
श्री सुधाकर देशमुख वृक्षमित्र
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
दिनांक २५/०२/२०२६ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर, विद्यार्थी विकास विभाग व मानवलोक समाजकार्य महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय पर्यावरण संरक्षण व कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटक श्री सुधाकर देशमुख वृक्षमित्र पाटोदा, श्री समीर पठाण अंबाजोगाई, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव, डॉ. नजीर शेख, डॉ. किसान शिनगारे व या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. हनुमंत साळुंके हे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक श्री सुधाकर देशमुख यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालय परिसरामध्ये वडाचे झाड लावून केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सध्याच्या युगामध्ये पर्यावरणाचे रक्षण करणे ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज असून वृक्ष संवर्धन व जतन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
श्री समीर पठाण यांनी आपल्या मार्गदर्शनात पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधतेचे संवर्धन यासाठी येणाऱ्या काळात शासनाने “घनदाट जंगल” ही संकल्पना प्रभावीपणे राबवावी, वाढते शहरीकरण, जंगलतोड आणि हवामान बदल यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. असे म्हटले.
अध्यक्षीय समारोपात डॉ प्रकाश जाधव यांनी हवामान बदल, वायू व जलप्रदूषण, प्लास्टिक कचरा आणि वनतोड यांसारख्या समस्यांमुळे समाजासमोर निर्माण झालेल्या संकटांचा आढावा घेतला.
पर्यावरण संरक्षण व प्रशिक्षण या कार्यशाळेच्या प्रस्ताविक भाषणात डॉ. हनुमंत साळुंके यांनी पर्यावरणाचे वाढते महत्त्व आणि सध्याच्या काळातील त्यासमोरील आव्हाने यावर सविस्तर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान सोन्नर यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार आशिष सिरसाट यांनी मांडले.सदरील कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी या कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आली.









