

*कर्जत येथील दिमाखदार पुरस्कार सोहळयात अंबाजोगाई पञकार संघाला”आदर्श पञकार संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले*
*एस.एम.देशमुख हे पञकारांचे प्रश्न सोडवणारे लढवय्ये नेते-ज्येष्ठ पञकार हेमंत देसाई*
*अ.भा.म.पञकार परिषद अंबाजोगाई संघाचे गजानन मुडेगावकर, बालाजी खैरमोडे,अभिजीत लोमटे यांचे केले विशेष कौतुक*
अंबाजोगाई (प्रतिनिधी) दिनांक 22 फेब्रुवारी रोजी कर्जत ( जि.रायगड ) येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद च्या वतीने महर्षी रंगाण्णा वैद्य आदर्श जिल्हा व वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळ्यात अखिल भारतीय मराठी पञकार परिषद अंबाजोगाई संघाला मराठवाडा विभागातून “विशेष पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले”.सदरील पुरस्कार हा अ.भा.म.पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख व अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.
कर्जत शहरातील राॅयल गार्डन सभागृहात दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.या दरम्यान,भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली.सदर शोभायात्रेत शेकडो पञकारांनी सहभाग घेत अखिल भारतीय मराठी पञकार परिषदेचा विजय असो,एस.एम.देशमुख सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,च्या घोषणा देण्यात आल्याने सर्व परिसर पञकारांच्या घोषणेने दणाणून गेला होता.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एस.एम.देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खा.श्रीरंग अप्पा बारणे (मावळ लोकसभा मतदारसंघ),आ.महेंद्र थोरवे (कर्जत खालापूर विधान सभा ),मंदार फणसे (संपादक न्यूज 18 मराठी),किरण नाईक (विश्वस्त, अ.भा.म.पञकार परिषद) ,माजी खासदार,रमेश ठाकूर,हेमंत देसाई (ज्येष्ठ पञकार, विचारवंत),मिलिंद अष्टीवकर (अध्यक्ष अ.भा.म. पञकार परिषद ),शिवराज काटकर (कार्याध्यक्ष, अ.भा.म.प.परिषद) यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.
*अंबाजोगाई संघाला आदर्श पञकार संघ म्हणून विशेष पुरस्कार प्रदान*
गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अंबाजोगाई पञकार संघाला मराठवाडा स्तरावरील “आदर्श पञकार संघ “म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या सोहळयास महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील पञकार उपस्थित होते.
*दरम्यान, शासकीय कर्मचारी मुंबई महासंघाचे राज्य सरचिटणीस सुर्यकांत इंगळे व मुंबईतील प्रसिद्ध लोकनेते राजेश खंदारे यांच्या सहकार्यातून कर्जत परिसरातील बिरदोले या छोट्याशा गावातील भगवान सेठ यांच्या निसर्ग रम्य निवासस्थानी अंबाजोगाई येथून आलेल्या संबंधित पञकारांच्या निवास व भोजनाची विशेष व्यवस्था करून आदर्श पञकार संघ म्हणून पुरस्कार जाहीर झाल्याने यथोचित सत्कार केला.*
यावेळी सोहळ्यास अखिल भारतीय मराठी पञकार परिषदेचे अंबाजोगाई तालुका शाखेचे गजानन मुडेगावकर (बीड जिल्हाकार्याध्यक्ष) , बालाजी खैरमोडे (प्रिंट तालुकाध्यक्ष), अभिजीत लोमटे ( डीजीटल मिडीया तालुकाध्यक्ष), सतिश मोरे (कार्याध्यक्ष),मारुती जोगदंड (ता.सचिव), एस.एस.उदारे ( कृती हल्ला समिती तालुकाध्यक्ष ) अशोक कोळी,गोविंद सुर्यवंशी, अनिरुद्ध पांचाळ,स.का.पाटेकर,अभय जोशी,अमोल माने,सचिन मोरे,जहांगीर इनामदार,योगेश डाके या प्रमुख पञकारांची उपस्थिती होती.









