ब्रेकिंग न्यूज

बीडमध्ये खळबळ !  शिवसेना पदाधिकाऱ्यांने गळफास घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न.

सरपंच,ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून चिट्ठी लिहून घेतला गळफास.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील ढेकनमोहा येथे ग्रामपंचायतीच्या कारभारावरून मोठा वाद निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख भारत देवकते यांनी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत देवकते यांनी लिहिलेल्या पत्रात गावातील सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे आपण प्रचंड मानसिक त्रास सहन करत असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यासाठी राज्य सरकारने विविध योजना राबवल्या नसून यासाठी गाय गोठा, विहीर व घरकुल अश्या अनेक योजना आहेत. परंतु सरपंच व ग्रामसेवक जाणीवपूर्वक फाईल अडवत असल्याचे आरोप देवकते यांनी केला आहे.ग्रामपंचायत प्रशासनाकडून कामात अडथळे आणले जात असल्यामुळेच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केल्याचे सांगितले जाते.

घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक व नातेवाईकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी बीड शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. पत्रातील आरोपांची पडताळणी केली जात असून तपासानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या घटनेनंतर ढेकनमोहा गावातील ग्रामपंचायत कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उचलेले टोकाच्या पावलामुळे ग्रामपंचायत कारभारावर नागरिकांमध्ये संताप व्यक्त आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button