कत्तलसाठी जनावरे वाहतूक करणारा पिकअप पोलिसाच्या ताब्यात अडवला.
विश्वहिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून पिकप अडवले.

बीड (प्रतिनिधी): कत्तलीसाठी जनावरे वाहतूक होत असल्याच्या संशयावरून विश्व हिंदू परिषद च्या कार्यकर्त्यांनी सतर्कता दाखवत एक पिकअप वाहन अडवले. ही घटना बीड शहरातून नेकनूरकडे जाणाऱ्या मार्गावर बीड-पाली रोडवरील खजाना विहिरीजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, MH 23 E 2224 क्रमांकाच्या पिकअपमधून जनावरे नेली जात असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानंतर संबंधित वाहन अडवून तात्काळ डायल 112 वर संपर्क साधत पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये जनावरे असल्याचे आढळून आले. त्यानंतर वाहन पुढील चौकशी व कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
दरम्यान, बीड परिसरात कत्तलीसाठी जनावरे वाहतूक होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत सतर्क राहून काही वाहने अडवण्यात आली असून संबंधित जनावरे गोशाळेत हलविण्यात आल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.
या कारवाईवेळी गोसेवा गतिविधी देवगिरी प्रांताचे आनंदजी बार्शीकर, बीड शहरमंत्री प्रशांत डोरले, धर्मजागरण गटाचे किशनसिंग चौहान यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. पुढील तपास पोलीस करत आहेत.










