ब्रेकिंग न्यूज

बीडमध्ये मध्यरात्री स्कॉर्पिओ चोरीस.

स्कॉर्पिओ चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद.

बीड(प्रतिनिधी )बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसत आहे. यातच आता बीड शहरातील राजीव गांधी चौक परिसरात मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरी करत घरासमोर उभी असलेली स्कॉर्पिओ गाडी लंपास केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १९ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास एका स्विफ्ट कारमधून आलेल्या चोरट्यांनी घरासमोर उभी असलेली MH 44 AA 7575 क्रमांकाची स्कॉर्पिओ काही मिनिटांतच चोरून नेली. चोरटे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा सुरू आहे. संबंधित प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला असून पोलिसांनी रात्रीची ग्रस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button