ब्रेकिंग न्यूज

बीड पोलीस भरतीत तरुणाचा मृत्यू.

पोलीस भरती दरम्यान कोसळल्याने खळबळ

 

बीड(प्रतिनिधी)बीड  येथे सुरू असलेल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीदरम्यान आज एक हृदयद्रावक घटना घडली. धावण्याच्या फेरीत सहभागी झालेला उमेदवार अचानक चक्कर येऊन मैदानावर कोसळला. प्रसंगावधान राखत उपस्थित अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला उचलून बीड येथील शासकीय रुग्णालयात हलवले.

रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अनपेक्षित घटनेमुळे भरती ठिकाणी काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि उमेदवारांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता वाढल्याचे दिसत आहे, यामुळे पोलीस भरती चाचणी ही सकाळी सात वाजता सुरू करण्यात यावी. 

मृत तरुणाचे नाव दीपक भास्कर वावळ असून तो परळी तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेनंतर पोलीस प्रशासनाकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button