ब्रेकिंग न्यूज

दगडाने ठेचून तरुणाची हत्या !

जिल्हा हदरला ! खोकरमोहा परिसरातील घटना;आरोपी फरार..

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यात मारिमारी, चोरी व खुनाच्या घटनेत वाढ झाली असून पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

 बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील खोकरमोह शिवारात ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २) उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मृत तरुणाची ओळख चांद उर्फ गुड्डू अलाउद्दीन तांबोळी (वय ३०, रा. रायमोह) अशी झाली आहे. तो व्यवसायाने कलर (रंगकाम) कामगार होता. सोमवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या दरम्यान त्याचा मृतदेह खोकरमोह शिवारात आढळून आला. अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच शिरूर कासार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव, रायमोह पोलीस चौकीचे कर्मचारी रवी उबाळे व इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे.

हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button