ब्रेकिंग न्यूज

वसुलीसाठी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा आक्रमक- वसुलीसाठी धाडल्या नोटिसा..

नगरपरिषद अंबाजोगाई.

*वसुलीसाठी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा आक्रमक -कार्यालयांना धाडल्या नोटीस*
अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी आणि नगरपालिकेच्या आर्थिक विकासाच्या शिस्थीसाठी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंडदा यांनी आता आक्रमक पाउल उचलले आहे. शहरातील अनेक शासकीय कार्यालयानी नगर पालिकेचा तब्बल २ कोटी रुपया पेक्षा जास्त मालमत्ता कर थकवल्याची धक्कादायक माहिती समीर आली असून पालिकेचा गाडा रुळावर आणण्यासाठी आणि कर्मचारी वेतन वेळेवर करण्यासाठी आता या थकबाकीदार कार्यालयाना नोटीस धाडण्याचे सत्र चालू झाले आहे. अंबाजोगाई नगर पालिकेची आर्थिक स्थितीचा मार्ग मागील काही वर्षात खालावला होता. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कंत्राटी कामगारांना आंदोलनाचा मार्ग अवलंब करावा लागला . हि परिस्थिती बदल्यान्यासाठी नगराध्यक्ष यांनी कारभार हाती घेताच स्तर वसुलीवर भर दिला. पालिकेच्या उत्पन्नातून कंत्राटीकामगारांचे देणी भागवली जातात, पगार,पथदिव्यांचे बील, पंप हाउस फिल्टर3 हाउसचा खर्च ई. मात्र मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने पालिकेच्या कामात अडचणी येत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button