
बीड ( प्रतिनिधी)बीड शहराजवळील बंधुसरा प्रकल्प (तलाव) परिसरात आज सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
मृताची ओळख संकेत नवले अशी पटली असून तो मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होता, अशी माहिती मिळाली आहे.
संकेत तुकाराम नवले वय 23 वर्ष राहणार पाली असे मृत तरुणाचे नाव आहे.
दोन दिवसापासून संकेत घरातून बाहेर पडला होता तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला होता. तलावाजवळ त्याचे कपडे, चप्पल आढळून आल्यामुळे अनिष्ट घटनेची शक्यता व्यक्त केली जात होती. गावकऱ्यांनीही परिसरात शोधमोहीम राबवली होती. अखेर आज सकाळी तलावात त्याचा मृतदेह आढळून आला.
बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी बीड शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
या घटनेमुळे पाली गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. संकेत नवले यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.







