ब्रेकिंग न्यूज

सनी आठवलेला पुण्यातून अटक.

सनी आठवले माकोकातील फरार आरोपी,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

 

बीड(प्रतिनिधी)मोक्का (MCOCA) व इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या एक वर्षापासून फरार असलेला सनी शामराव आठवले (वय 28, रा. माळीवेस, बीड) याला अखेर बीड पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. या कारवाईमुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.

सनी आठवले याच्यावर बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे, पेठ बीड पोलीस ठाणे तसेच केज पोलीस ठाण्यात मिळून एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये खून, अग्निशस्त्राचा वापर, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे अशा गंभीर स्वरूपाच्या आरोपांचा समावेश आहे.

गेल्या वर्षभरापासून तो पोलिसांना चकवा देत फरार होता. त्याचा माग काढण्यासाठी बीड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत तपास सुरू ठेवला होता. अखेर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी पुण्यात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी बंटेवाड, पीएसआय महेश विघ्ने, महेश जोगदंड, मनोज परजणे आणि बप्पासाहेब घोडके यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

अटक केलेल्या सनी आठवले याला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बीडकडे घेऊन येत आहे.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button