GST अधिकारी सचिन जाधवर यांच्या मुलाचा शाळेतून अपहरणाचा प्रयत्न !
सुसाईड नोट मधील नाव असलेले अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी.

बीड – मांजरसुंबा येथील कपिलधारजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधव यांचा मृतदेह आढळून आल्याने काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, जाधव कुटुंबीयांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सचिन जाधव हे जीएसटी कार्यालयात अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोट सापडल्याची माहिती समोर आली होती. त्या नोटमध्ये कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.जा
दिनांक 23 जानेवारी रोजी जाधवर यांची पत्नी, आई, भाऊ, बहीण आणि इतर नातेवाईक यांनी बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांची भेट घेतली. दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी जाधव यांच्या पत्नीने आणखी धक्कादायक माहिती दिली. आठ दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाचे शाळेतून अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सचिन जाधव कार्यालयात जात असताना एका चारचाकी वाहनाने धडक देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर त्यांना शिवीगाळही करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले. या सर्व घटनांमुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, असे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण पोलीस अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची देखील माहिती मिळत असून दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणले जाईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील अधिकारीवर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आता या तपासाकडे लागले आहे. परंतु आज जाधव वर कुटुंबीयांनी दिलेल्या धक्कादायक माहितीमुळे एकच खळबळ उडाली.







