ब्रेकिंग न्यूज

२४ तासांत अल्पवयीन पीडितेचा शोध;आरोपी ताब्यात.

PSI पल्लवी जाधव व AHTU पथकाची उल्लेखनीय कामगिरी.

 

बीड (प्रतिनिधी) बीड ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर २०७/२०२५ अन्वये दाखल असलेला गुन्हा (कलम १३७(२) भान्यास) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे (AHTU) दिनांक १५/०१/२०२६ रोजी दुपारी वर्ग करण्यात आला. तपास वर्ग होताच अवघ्या २४ तासांत अल्पवयीन पीडित मुलीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यात AHTU पथकाने यश मिळवले.

तपासाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी मूळ फाईलचे सखोल अवलोकन केले. त्यानंतर फिर्यादी व साक्षीदारांची भेट घेऊन गुन्ह्याबाबत सविस्तर चौकशी करण्यात आली. मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत पीडित मुलगी व आरोपी यांचे वास्तव्य बुलढाणा जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले.

बीड पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार रात्री ९ वाजता AHTU चे पथक बुलढाणा जिल्ह्याकडे रवाना झाले. दिनांक १६/०१/२०२६ रोजी पहाटे ३ वाजता मिळालेल्या माहितीनुसार सोनाळा (ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) येथे पथकाने शोधमोहीम राबवून पीडित मुलगी व आरोपीला त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. पोस्टे सोनाळा येथे आवश्यक नोंद करून पथक त्यांना घेऊन सकाळी ९ वाजता बीडकडे रवाना झाले.

बीड येथे आल्यानंतर पीडित मुलीला विश्वासात घेऊन समुपदेशन करण्यात आले तसेच तिची आई-वडिलांशी भेट घडवून देण्यात आली. त्यानंतर पीडित मुलगी व आरोपी यांना पुढील तपासासाठी पोस्टे बीड ग्रामीण येथे हजर करण्यात आले.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पल्लवी जाधव, पोलीस हवालदार उषा चौरे, हेमा वाघमारे, पोशी योगेश निर्धार, गजानन चौधरी तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, बीडच्या पथकाने केली.

AHTU पथकाच्या तत्परतेमुळे अल्पवयीन पीडितेला सुरक्षिततेचा दिलासा मिळाला असून आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरू आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button