लिंबागणेश येथे किरकोळ कारणावरून मारहाण.
जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची दिली धमकी,गुन्हा दाखल.

बीड (प्रतिनिधी)बीड तालुक्यातील लिंबागणेश गावात संक्रांतीच्या दिवशी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणास तिघांनी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.मारहाणीत डोळ्याला जखम झाली असून हाथ फॅक्चर झाला आहे.
या प्रकरणी नेकनुर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अरुण पंडित निर्मळ (वय 31, व्यवसाय शेती व मजुरी, रा. लिंबागणेश, ता. जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास लिंबागणेश येथील बसस्थानका जवळील रस्त्यावर त्यांच्या भावासोबत तिघा आरोपींनी भांडण केले.
गावात गजरे विक्रीसाठी आलेल्या अनोळखी विक्रेत्याकडून दर कमी मागितल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या अरुण निर्मळ यांना आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी अभिजित गायकवाड याने कुदळीच्या लोखंडी दांड्याने डाव्या हाताच्या कोपराजवळ व उजव्या पायाच्या पिंडरीवर मारहाण केली,तर तुषार गायकवाड याने डोळ्याजवळ बुक्की मारून जखमी केले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटना पाहून स्थानिक नागरिकांनी भांडण सोडवले. मात्र जाताना आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. जखमी अरुण निर्मळ यांनी सरकारी दवाखाना, बीड येथे उपचार घेतल्यानंतर नेकनुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी आरोपी 1)तुषार गणपत गायकवाड2) अभिजित गणपत गायकवाड3)रोहित राजेंद्र भोसले(सर्व रा. लिंबागणेश, ता. जि. बीड)यांच्याविरुद्ध मारहाण जातिवाचक शिवीगाळसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नेकनुर पोलीस करत आहे.







