ब्रेकिंग न्यूज

गेवराईत गुटख्यावर कारवाई;12 लाखांचा मुद्देमाल जप्त.

दोन आरोपी ताब्यात,गेवराई पोलिसांची कारवाई.

 

गेवराई शहरात पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध गुटखा व मावा तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. छापा मारून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुगंधीत तंबाखू, सुपारी, चुना, मावा बनवण्याचे साहित्य, वाहनांसह सुमारे 11 लाख 98 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात गुटखा व इतर अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिल्यानुसार, दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गेवराई पोलिसांनी पथक तयार केले. सकाळी गेवराई शहरातील शानदार पान सेंटर येथे छापा टाकण्यात आला.

या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेले आरोपी

1. समीर मेहबूब शेख (वय 39, व्यवसाय – पानटपरी), रा. गायकवाड जळगाव, ता. गेवराई, जि. बीड

2. अमजद जाफर शेख (वय 41, व्यवसाय – मजुरी), रा. विवाह मांडवा, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर (सध्या रा. कोरबू गल्ली, गेवराई)

आरोपींच्या ताब्यातून मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे सुगंधीत तंबाखू, सुपारी, चुना, इतर मिश्रण, मानवी शरीरास अपायकारक असा तयार मावा, मावा बनवण्याचे दोन मिक्सर, तसेच मावा वाहतूक व विक्रीसाठी वापरण्यात येणारी स्विफ्ट कंपनीची कार आणि PRAISE PRO कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी असा मोठा साठा जप्त करण्यात आला.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ, पोउपनि. राम खोत, पोहेकॉ/954 हंबर्डे, पोको/2112 जितेंद्र ओव्हाळ, मपोको/1973 कोंता यांच्या पथकाने केली.

या प्रकरणात संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास गेवराई पोलीस करत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button