
बीड नगरपालिका निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर झाला असून, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला 18 जागांवर घवघवीत यश मिळाले आहे. तसेच नगराध्यक्ष पदासाठी अजित पवार गटाच्या उमेदवार प्रेमलता पारवे या विजयी झाल्या आहेत.
दरम्यान, बीड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून हालचालींना वेग आला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास दहा नगरसेवकांनी विनोद मुळूक यांच्या नावाचा अर्ज बीड नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
या घडामोडींवरून असे स्पष्ट संकेत मिळत आहेत की पहिल्या टर्ममध्ये उपनगराध्यक्ष पद विनोद मुळूक यांनाच दिले जाण्याची दाट शक्यता आहे.
या अर्जप्रक्रियेच्या वेळी बीड नगरपालिकेत मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी नगरसेवक फारूक पटेल, निजामभाई, भैय्यासाहेब मोरे, रणजित बनसोडे, महेश धांडे यांच्यासह इतर अनेक नगरसेवक उपस्थित होते.
राजकीय वर्तुळात या घडामोडींमुळे उत्सुकता वाढली असून, उपनगराध्यक्ष पदावर अंतिम शिक्कामोर्तब आज दुपारीं जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे.







