ब्रेकिंग न्यूज

पहिल्याच दिवशी नगरपालिकेत फारोक पटेल नाराज;फेटा बांधण्यास केला नकार.

ब्रेकिंग न्यूज ! उपनगराध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद उघड.

बीड(प्रतिनिधी)बीड नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांनी आज दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी पदभार स्वीकारला. या पदभार स्वीकार सोहळ्याला आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकतेच निवडून आलेले 18 नगरसेवक व मित्र पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते.

मात्र, आनंदाच्या वातावरणातच पहिल्याच दिवशी नगरपालिकेमध्ये नाराजी नाट्य पाहावयास मिळाले. नगराध्यक्षांच्या पदभार स्वीकार सोहळ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते फारूक पटेल यांनी फेटा बांधण्यास स्पष्ट नकार दिला. आमदार विजयसिंह पंडित यांनी स्वतः फेटा बांधण्याची विनंती केली असतानाही, “मी फेटा बांधणार नाही,” असे फारूक पटेल यांनी सर्वांसमोर ठामपणे सांगितल्याने उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.

या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली असून, नगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पहिल्याच दिवशी मतभेद उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, फारूक पटेल हे बीड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत असून, याच कारणामुळे हा नाराजीचा सूर उमटल्याची चर्चा शहरभर पसरली आहे.

नगरपालिकेच्या नव्या कारभाराची सुरुवातच वादाच्या पार्श्वभूमीवर झाल्याने, येत्या काळात सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत राजकारण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button