ब्रेकिंग न्यूज

पाली येथील शांतीवनात अश्लील चाळे;दामिनी पथकाची धडक कारवाई.

PSI पल्लवी जाधव यांनच्या पथकाने केली १५ तरुण/तरुणीवर कारवाई.

बीड (प्रतिनिधी)पाली येथील शांतीवन परिसरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांविरोधात दामिनी पथकाने धडक कारवाई करत १५ युवक व युवतींवर मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

दामिनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, पाली येथील शांतीवनात मोठ्या प्रमाणावर जोडपी फिरत असून सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करत आहेत. या माहितीच्या आधारे दामिनी पथक तात्काळ शांतीवन परिसरात दाखल झाले.

   दामिनी पथकाने पाली येथील शांतीवन येथे जाऊन  छापा टाकला असता तेथे अनेक जोडपी आढळून आली. सर्वांना ताब्यात घेऊन दामिनी पथकाने बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर केले. यानंतर १५ युवक व युवतींवर मुंबई पोलीस अधिनियम कलम ११०/११७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच संबंधितांचे समुपदेशनही करण्यात आले.

   ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,पोलिस उपअधीक्षक पूजा पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत PSI पल्लवी जाधव, सहाय्यक फौजदार मीरा रेडेकर, पोलीस हवालदार शोभा जाधव, उषा चौरे, अशोक शिंदे, पोलीस शिपाई योगेश निर्धार यांच्यासह दामिनी पथक व AHTU बीडच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

सार्वजनिक ठिकाणी शिस्त व सामाजिक भान राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले असून अशा प्रकारांना यापुढेही कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button