टोलनाका हल्ला प्रकरणी बांगर कुटुंबीय व भायाळ ग्रामस्थांनी घेतली SP नवनीत कॉवत यांची भेट.
बांगर कुटुंबीय आक्रमक;हल्ले करणारे आ.धस यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप.पहा काय म्हणाले कुटुंबीय !

बीड(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील वैधकिन्ही (ता. पाटोदा जि.बीड)येथील टोल नाका परिसरात रात्री दिनांक २९ डिसेंबर रोजी वादातून बांगर कुटुंबीयांवर बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एका महिलेसह तीन पुरुष गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींवर बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, टोल नाका परिसरात शेतात उभारण्यात आलेल्या हॉटेलच्या उद्घाटनावरून वाद झाला. तुझ्या शेतात हॉटेल का बांधले? उद्या उद्घाटन कसे करतोस ते पाहतोच, अशा धमकीवजा भाषेतून वादाला सुरुवात झाली. त्यानंतर काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी बांगर कुटुंबावर अचानक हल्ला चढवत काठी, लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात बांगर कुटुंबातील एका महिलेला तसेच तीन पुरुषांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून समाजबांधवांनी संताप व्यक्त केला आहे. हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास टोल नाका बंद करण्याचा इशारा समाजबांधवांनी दिला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. जखमी बांगर कुटुंबीयांनी हल्लेखोरावर कडक कारवाईची मागणी केली आहे. आरोपींना अटक केली नाही तर टोल नाक्यावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असून टोलनाका देखील बंद करण्यात येणार असल्याचा इशारा बांगर कुटुंबियांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये मराठा वंजारी वादाचा आता विकोपाला गेला आहे जातीच्या देशातून मारण्याचा आरोप हा मारहाणी मध्ये जखमी झालेल्या व्यक्तींकडून करण्यात आलेला आहे पोलीस अधीक्षक कार्यालया वरती मोठा जमावाचा होत फाटा घेऊन समाज बांधव त्या ठिकाणी गेले होते एस पी नवनीतकावत यांना त्या ठिकाणी निवेदन देण्यात आले जखमी महिला पुरुषांना मारहाण झाली रस्त्यावर रस्त्याची पाठवाण्याची पाठवा असताना पोलीस प्रशासनाला दिसत नाहीत का? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला आहे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत आता या प्रकरणा मध्ये काय कारवाई करतात याकडे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील लक्ष लागलेले आहे मारहाण करणारे हे आमदार सुरेश धस यांचे निकटवर्तीय पीडित महिलेने केलेला आहे. आरोपीला अटक झाली नाही तर टोल नाक्यावर आंदोलन करण्याचाही इशारा यावेळी बांगर कुटुंबीयांनी दिला.







