ब्रेकिंग न्यूज

वाहन नोंदणी मालिका “MH44AJ” अंबाजोगाई आर. टि. ओ. चालू होतं आहे.

आकर्षक नोंदणी क्रमांक आवेदन १'२ जाने. २६ रोजी करावेत.

*आर टि ओ कार्यालय अंबाजोगाईमध्ये “एम एच ४४ ए जे” हि मोटरसायकल मालिका सुरू*
अंबाजोगाई – प्रतिनिधी :—
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाई यामध्ये मोटरसायकल नवीन नोंदणी साठीची नवीन नोंदणी मालिका एम एच 44 एजे ही मालिका चालू होत आहे.
आता चालू असलेली एम एच ४४ ए एच ही मालिका संपत असल्याने आता नवीन मालिका उपलब्ध करून देण्यात येत आहे दिनांक सहा जानेवारी 2026 रोजी पासून संवर्ग वाहन 4.0 संगणक प्रणालीवर ही नवीन वाहन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत आहे नवीन मोटरसायकल नोंदणीसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक आता एम एच 44 ए जे या मालिकेतून दिले जाणार आहेत यामध्ये आकर्षक क्रमांक शुल्क 5000 पेक्षा जास्त असल्यास वाहन धारकाला वाहन नोंदणी क्रमांक घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एचडीएफसी आयसी आयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा चे धनादेश मतदान कार्ड बँक पासबुक लाईट बिल एलआयसी पॉलिसी जोडावे लागणार आहे हे अर्ज दिनांक एक जानेवारी 2026 तसेच 2 जानेवारी 2026 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील त्यानंतर आलेले अर्ज घेतले जाणार नाहीत दिनांक पाच जानेवारी 2026 रोजी सकाळी बारा वाजेपर्यंत एकाच क्रमांकासाठी जास्त अर्ज आल्यास त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात येईल आणि आणि त्याच दिवशी आकर्षक क्रमांक शुल्क दुपारी अडीच वाजेपर्यंत भरणा करावा लागेल त्यानंतर आलेले अर्ज बाद करण्यात येते यासाठी संबंधित क्रमांक शुल्काशिवाय बंद लिफाफ्यामध्ये धनादेश आणि बंधनकारक आहे असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाई यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button