बीड जवळील सह्याद्री देवराई डोंगराला भीषण आग.
अनेक झाडे आगीत भस्मसात;आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न.

बीड शहरापासून जवळच असलेल्या देवराई डोंगराला आज दिनांक २४ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले असून संपूर्ण डोंगर परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.
आगीची माहिती मिळताच बीड शहरातून वृक्षप्रेमी नागरिक आणि अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. डोंगराळ आणि दुर्गम भाग असल्याने तसेच आगीचा वेग वाढत गेल्याने आग विझवण्याचे काम अधिकच कठीण होत आहे.
सध्या अनेक नागरिक स्वतःहून मदतीसाठी पुढे येत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वनसंपदा आणि जैवविविधतेला या आगीमुळे मोठा धोका निर्माण झाला असून या आगीत अनेक मोठे झाड देखील बस बसाल झाल्याची माहिती मिळत आहे.यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
प्रशासनाकडून व नागरिकाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.








