
रिल स्टार आशिष मुंडे यांची गळफास घेऊन आत्महत्या ; ममदापूर गावावो शोककळा
अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर येथील तरुण रिल स्टार आशिष मुंडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.या दुःखद घटनेमुळे संपूर्ण ममदापूर गावावर शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
आशिष मुंडे हे सोशल मीडियावर रिल्सद्वारे परिचित होते.त्यांच्या अकाली निधनाने मित्र परिवार,चाहत्यांमध्ये मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच शोककळा पसरली.
या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पश्चात आई-वडील,भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या दुर्दैवी घटनेमुळे ममदापूर सह अंबाजोगाई तालुक्यात शोक व्यक्त केला जात आहे.




