ब्रेकिंग न्यूज

बीड शहरात वेश्या व्यवसायावर छापा.

एक महिला,पीडिता व एक पुरुष ताब्यात.AHTU पथकाची धडक कारवाई.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील धानोरा रोड ,येथील पालवन चौकाजवळील एका वसाहतीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी कारवाई केली आहे.या भागात गेल्या अनेक महिन्यापासून वेश्याव्यवसाय चालत असल्याची कुजबूज होती.

PSI पल्लवी जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार AHTU (Anti Human Trafficking Unit) पथकाने संबंधित इमारतीवर धाड टाकली.

  या कारवाईत वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन महिला तसेच एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी व कायदेशीर कारवाईसाठी तिघांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी दाखल करण्यात आले.

PSI पल्लवी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही दिवसांपासून बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू असून, या कारवाईमुळे अशा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

बीड शहरातील काही लॉजवर खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असल्याची चर्चा बीड शहरात ऐकवायच मिळत असून अशा लॉजवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकतन होत आहे.

पोलीस प्रशासनाकडून अशा कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

ही कारवाई बीड पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत,  अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपअधीक्षक पूजा पवार होम dysp उमाशंकर कस्तुरे साहेब 1)PSI पल्लवी जाधव मॅडम2) ASI मीरा रेडेकर मॅडम3)LHC उषा चौरे मॅडम4) HC अशोक शिंदे सर5)HC प्रदीप येवले सर6)PC योगेश निर्धार यांनी केली.

बीड शहरात बेकायदेशीर व्यवसाय सुरू असेल तर याची माहिती देण्यात यावी : PSI पल्लवी जाधव : 9689481244

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button