राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी सेलच्या प्रदेश संघटक सचिव पदी उमेश गायकवाड यांची निवड.
पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार:उमेश गायकवाड.

बीड (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा.शरदच्रदंजी पवार, प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सुचनेवरुन व विधी मंडळ गटनेते जयंत पाटील, राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते आ.जितेंद्र आवाड, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, राज्याचे प्रवक्ते प्रा.शिवराज बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येय धोरणे व शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रात पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज राजपूरकर यांनी बीड शहरातील उमेश (रामेश्वर) आसाराम गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत या युवा नेतृत्वाला संधी देत पक्षाच्या ओबीसी सेलच्या प्रदेश संघटक सचिव पदाची मोठी जबाबदारी देवून त्यांची निवड केली. त्यांना नुकतेच मुख्य प्रवक्ते आ.जितेंद्र आवाड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज व फुले-शाहू-आंबेडकर यांची प्रेरणा घेवून सर्व सामान्य कुटूंबातील उमेश (रामेश्वर) गायकवाड हे अनेक वर्षापासून बीड येथे समाजकार्यात अग्रेसर आहेत. कोरोना काळातील त्यांचे समाज कार्य हे प्रशंसनीय आहे, त्या काळात त्यांनी आपल्या जीवाचे रान करत गरजूंना धान्य वाटप, किराणा साहित्याचे वाटप केले आहे. तसेच कोराना काळात त्यांनी मोफत सॅनीटाईझर वाटप केले आहे. स्वत: कोरोना ग्रस्तांच्या मदतीला धावून जात रुग्णांना व कुटूंबीयांना जेवनाचे डब्बे देखील दिलेले आहेत. शहरातील नागरीकांच्या कोणत्याही अडीअडचणीच्या प्रसंगात धावून जात त्यांचे प्रश्न समजावून घेत मार्गी लावण्याचे कार्य ते करत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने त्यांच्या खांद्यावर पक्षाच्या ओबीसी सेलच्या प्रदेश संघटक सचिव पदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. यावेळी उमेश (रामेश्वर) गायकवाड म्हणाले की, महापुरुषांना अभिप्रेत असलेला समाज व राष्ट्र निर्माण करण्यासाठी पक्षाची विचारधारा तळागाळात पोहचविण्यासाठी मी कायम कटीबध्द राहील अशी ग्वाही या निवडी प्रसंगी त्यांनी दिली. उमेश गायकवाड यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिंनदन होत आहे.





