ब्रेकिंग न्यूज

राष्ट्रवादी काँग्रेस(SP)गटाच्या ओबीसी सेलच्या प्रदेश संघटकपदी उमेश गायकवाड यांची निवड.

पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार.उमेश गायकवाड.

बीड (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या ओबीसी सेलच्या प्रदेश संघटकपदी उमेश गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल पक्ष कार्यकर्ते व समर्थकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उमेश गायकवाड हे गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून, नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. तरुण व गरजूंच्या अडचणींना धावून जाणारा चेहरा म्हणून त्यांची बीड शहरात ओळख आहे.

बीड शहरातील गांधीनगर भागात राहणारे उमेश गायकवाड हे अठरापगड जातींना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व म्हणूनही परिचित आहेत. ओबीसींसह इतर समाजातील तरुणांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ओबीसी सेलच्या प्रदेश संघटकपदी निवड झाल्यानंतर उमेश गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, एकनाथ आव्हाड, साहेब,प्रदेशाध्यक्ष महबूब शेख तसेच युवा नेते शिवराज बांगर यांचे आभार मानले.

पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचा विश्वास उमेश गायकवाड यांनी व्यक्त केला.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button