वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला.
वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ;जामीन अर्ज फेटाळल्याने वाल्मीक कराड समर्थकाला धक्का.

बीड(प्रतिनिधी)बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी व सूत्रधार वाल्मीक कराड याला मुंबई उच्च न्यायालया कडूनही मोठा झटका बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वाल्मीक कराड यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायालयात सुनावणी दरम्यान संतोष देशमुख यांना मारताना ज 23 व्हिडिओ पोलिसांनी न्यायाधीशासमोर सादर केले होते तसेच वाल्मीक कराडचा आवाज व त्या मोबाईल रेकॉर्डिंग चा आवाज मॅच होत असल्याने देखील वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत.
यापूर्वी बीड जिल्हा व सत्र न्यायालयानेही वाल्मीक कराड यांचा जामीन अर्ज नामंजूर केला होता. त्यानंतर दिलासा मिळावा या उद्देशाने वाल्मीक कराड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मात्र, तेथेही न्यायालयाने जामीन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला एक वर्ष पूर्ण झाले असतानाही या प्रकरणाने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ माजवली आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी व कट रचणारा म्हणून वाल्मीक कराड याच्याकडे पाहिले जात असून, या प्रकरणात न्यायालयीन कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने वाल्मीक कराड सध्या न्यायालयीन कोठडीतच राहणार आहे. या निर्णयामुळे संतोष देशमुख कुटुंबीयांना व न्यायासाठी लढणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर वाल्मीक कराड यांना जामीन मिळण्याची अनेक पोस्ट व्हायरल होत असून आज न्यायालयाने अर्ज फेटाळल्याने या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाले असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपीं विरोधातील तपास व न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.




