ब्रेकिंग न्यूज

मांजरसुंबा टँकर अपघात प्रकरणी पोलिसांची पैशांची मागणी.

पोलिसांनी टँकर चालकाच्या भावाकडून ३० हजाराची मागणी १० हजार ऑनलाईन घेतले.

बीड (प्रतिनिधी)बीड जवळील मांजरसुंबा घाट परिसरात तीन दिवसापूर्वी रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कंटेनर व डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा ओव्हरटेक करताना अपघात झाला होता या अपघातात इंधन घेऊन जाणारा टँकर पलटी होऊन रस्त्यावर डिझेल सांडल्याने मोठा स्फोट होऊन यामध्ये टँकर जळून खाक झाले होते.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.मात्र या अपघाताच्या अनुषंगाने ग्रामीण पोलीस स्टेशन, बीड येथील एका पोलीस कॉन्स्टेबलवर गंभीर स्वरूपाचे आरोप समोर आले आहेत.

अपघात झालेल्या टँकर चालकाच्या भाऊ अब्बास खान या परप्रांतीय युवकाला ग्रामीण पोलीस स्टेशनमधील पाली बीट वरील आतिष नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलने त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कॉन्स्टेबलने अब्बास खान याला पंचनाम्यासाठी बोलावून घेतले आणि “तुला एक महिना आत सडवतो” अशी धमकी देत ३० हजार रुपयांची मागणी केली.

युवकाला दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. अखेर रात्री ९ वाजून ७ मिनिटांच्या सुमारास कॉन्स्टेबल आतिष यांनी एक मोबाईल क्रमांक देत त्या क्रमांकावर फोन-पेद्वारे १० हजार रुपये पाठवण्यास भाग पाडले, असा आरोप आहे. रक्कम पाठवल्यानंतर संबंधित युवकाला एफआयआरची झेरॉक्स प्रत व घटनास्थळी झालेल्या पंचनाम्याचे कागदपत्र देण्यात आले.

दरम्यान, “अजून एक ऑनलाइन कागद घ्यायचा आहे” असे सांगून पुन्हा संपर्कात ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. युवकाकडून पैसे पाठविल्याचे स्क्रीनशॉट उपलब्ध असून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांनी दिली.

या घटनेची माहिती एका मित्रामार्फत अजय सरवदे यांच्यापर्यंत पोहोचली. सुरुवातीला अब्बास खान फेसबुक लाईव्हवर येण्यास टाळाटाळ करत होता. मात्र पोलीस प्रशासनावर विश्वास असल्याचे सांगत, संपूर्ण प्रकार समजावून सांगितल्यानंतर तो फेसबुक लाईव्हवर आला आणि त्याने स्वतः घडलेला प्रकार जनतेसमोर मांडला.

या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून, काही मोजक्या कर्मचाऱ्यांच्या कथित गैरवर्तनामुळे संपूर्ण पोलीस खाते बदनाम होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, या घटनेबाबत पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण पोलीस स्टेशनमधील संबंधित कॉन्स्टेबल आतिष यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांनी केली आहे.

भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांमुळे खात्याची बदनामी :

बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आले असल्याचे चित्र आहे. मात्र संबंधित कॉन्स्टेबलच्या कथित गैरप्रकारांमुळे संपूर्ण पोलीस प्रशासन बदनामीच्या भोवऱ्यात सापडत आहे, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक व संबंधित पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी गंभीर दखल घेऊन तात्काळ निलंबनाची कारवाई करावी,अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button