
*तब्बल ९” ई बस” अंबाजोगाई डेपोला आल्या, प्रवाशा मध्ये आनंदाचे वातावरण*
अंबाजोगाई- प्रतिनिधी
पंचक्रोशीतील प्रवासी वर्गासाठी अत्यंत आनंददायी बातमी अंबाजोगाई आगाराला आता एक दोन नव्हे तर चक्क नव इलेक्ट्रिक बस प्राप्त झाल्यामुळे त्यातून आनंद व्यक्त करण्यात येतो आहे .राज्यातील मागील काही महिन्यापूर्वी चार्जिंग पॉईंट न झाले कारणाने या ठिकाणी इलेक्ट्रिक बसेस पाठवण्यात आलेले नव्हत्या नुकतेच या आजारात इलेक्ट्रिक पॉइंट बनवण्यात आल्याने आंबेजोगाई आगाराला आता तब्बल नऊ इलेक्ट्रिक बसेस प्राप्त झाल्या असून आगाराच्या आवारातच या इलेक्ट्रिक बसेस साठी स्वतंत्र डेपोला जागा देण्यात आलेली आहे अंबाजोगाई आगारात या बसेसचे आगमन झाल्यानंतर इलेक्ट्रिक बस आगाराचे आगार प्रमुख संदेश मुंडे व अंबाजोगाई आजाराचे आजार प्रमुख अमर राऊत सुपरवायझर महाजन यांच्या हस्ते या बसेसची पूजा करून उद्घाटन करण्यात आले या इलेक्ट्रिक बसेस पैकी तीन बसेस छत्रपती संभाजी नगर साठी दोन बसेस अहिल्यानगर तारकपूर साठी तर चार बसेस परभणी लातूर साठी सोडण्यात येणार आहेत अंबाजोगाई बस स्थानकातून छत्रपती संभाजी नगर साठी ही इलेक्ट्रिक बस सकाळी साडे आठ साडेनऊ साडेदहा वाजता सुटणार असून याच बसेस छत्रपती संभाजी नगर सिडको बस स्थानकातून सायंकाळी पाच सहा आणि सात वाजता परतीच्या प्रवासासाठी निघतील ही इलेक्ट्रिक बस तारकपूर जाण्यासाठी दुपारी तीन आणि सायंकाळी पाच वाजता अंबाजोगाई बस स्थानकातून निघेल तर परतीच्या प्रवासासाठी सायंकाळी साडेसहा व साडेसात वाजता निघेल अंबाजोगाई बस स्थानकातून लातूर व परत अंबाजोगाई मार्गे परभणीला जाण्यासाठी सकाळी पावणे सात सव्वा सात पावणे आठ आणि सव्वा आठ वाजता निघतील व परत परभणी बस स्थानकातून अंबाजोगाई मार्गे लातूर आणि लातूर वरून परत अंबाजोगाई जाण्यासाठी दुपारी एक दीड दोन व अडीच वाजता निघतील दरम्यान अंबाजोगाई आगाराला नऊ इलेक्ट्रिक बसेस प्राप्त झाल्यामुळे प्रवासी वर्गातून आनंद व्यक्त केला जातो आहे.






