बाळराजे पवारांना मध्यरात्री पोलिसांनी केली अटक.
मतदान दिनी राडा प्रकरणी अटक;एक दिवसाची पोलिस कोठडी,गेवराई पोलिस ठाण्यात बंदोबस्त वाढवला.

गेवराई नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना प्रभाग क्रमांक दहा मधील उर्दू शाळा या बूथ केंद्रावर पंडित /पवार गटात जंगी राडा झाला होता. मा. आ. अमरसिंह पंडित यांचे स्वीयसहाय्यक अमृत डावकर यांनाही कृष्णाई या निवासस्थानावर जाऊन बाळराजे पवार व काही समर्थकांनी मारहाण केली होती तसेच विरोधक कार्यकर्त्यांनी देखील त्यानंतर भाजपचे माजी आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या घरावर देखील दगडफेक करण्यात आली होती.
सदर प्रकरणात तक्रार दाखल करण्यासाठी दोन्हीपैकी कोणीही पुढे न आल्याने गेवराई पोलिसांनी सुमोटु नुसार फिर्याद दाखल केली होती तसेच या गु.नं. ७१७/२०२५ गुन्ह्या ३३३ हे अतिरिक्त कलम वाढले आहे व या प्रकरणात ५० पेक्षा अधिक जास्त लोकांना पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून अटक व सुटका केली आहे. पण या प्रकरणात बाळराजे पवार यांना पोलिसांनी दिनांक १६ डिसेंबर रोजी मध्यरात्री २:२४ मिनिटांने अटक केली असल्याची माहिती आहे.
याबाबत सविस्तर माहिती असे की गेवराई नगर परिषदेची निवडणूक पंडित पवार यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक होती तसेच प्रचार दरम्यान वादग्रस्त विधाने व मतदार यांना धमकी वजाबाकी केल्याप्रकरणी भाजपाच्या उमेदवार यांची देखील तक्रार निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे दिनांक २ डिसेंबर रोजी पंडित यांचे स्विय सहाय्यक अमृत डावकर यांना मारहाण त्यानंतर माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या निवासस्थानावर दगडफेक व चार ते पाच लोकांना यामध्ये गंभीर ईजा झाल्या होत्या. यामध्ये संकेत किशोर कांडेकर यांची देखील वेगळी फिर्याद दाखल आहे तसेच पवारांचे समर्थक विष्णू आतकरे यांच्यावर हा गुन्हा आहे.याच पार्श्वभूमीवर बाळराजे पवार यांना गेवराई पोलिसांनी मध्यरात्री अटक केले. बाळराजे पवार यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.तरी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गेवराई पोलिस शहरात व ठाण्यात पोलिसांचा बंदोबस्त वाढण्यात आला




