१ फेब्रुवारी २६ राज्यस्तरीय ब्राह्मण महाअधिवेशन संभाजीनगर येथे होणार
सचिन वाडेपटील-अ.भा.पे संघटना.

अंबाजोगाई-अभय जोशी
सर्व ब्राह्मण समाज बांधव यांना कळविण्यात येत आहे की आज झालेल्या बैठकीमध्ये ब्राह्मण अधिवेशन हे एक फेब्रुवारी रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून ह्या अधिवेशनात राज्यातून व इतर राज्यातून देखील समाज बांधव एकत्रित येणार आहे, ह्या अधिवेशनामध्ये उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती असणार आहे, तरी या ब्राह्मण अधिवेशनासाठी समाज बांधव यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित लावावी ही विनंती,
1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9ते7 या वेळेत मंथन हॉल, बीड बाय पास, MIT कॉलेज, छत्रपती संभाजी नगर येथे *ब्राह्मण अधिवेशन* आयोजित केले आहे.
आज सचिन वाडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपस्थिति विजय काजे, संदेश देशपांडे, संतोष जोशी, विवेक जोशी, काशीनाथ चांदजकर , महेश कुलकर्णी, रविंद्र पंडित, धनंजय नारळे, ऍड प्रसाद देशमुख, संजय देशपांडे, अभय जोशी, भास्कर देशपांडे, सुधीर धर्माधिकारी, अंजली कुलकर्णी, धंनजय कुलकर्णी, महेश राडकर ,विवेक वालेकर, संतोष वडगावकर, उज्वला कुलकर्णी, रजनी देशपांडे, उपस्थित होते.
अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख अभय जोशी यांनी दिली आहे,







