बस/दुचाकीची समोरसोमर धडक;शेतकऱ्याचा मृत्यू.
बीड नगर रस्त्यावरील काकडहिरा परिसरात भीषण अपघात.

बीड (प्रतिनिधी) : बीड नगर रस्त्यावर काल (10 डिसेंबर) रात्री झालेल्या बस दुचाकी भीषण अपघातात काकडहिरा येथील शेतकरी विश्वास बागलाने वय ४१ वर्ष यां शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्याहून बीडकडे येणाऱ्या बसने मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली.
ही घटना रात्री सुमारास 10 वाजता काकडहिरा परिसरात घडली. धडकेनंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. गंभीर जखमी अवस्थेत विश्वास बागलाने यांना तात्काळ बीड येथील रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
विश्वास बागलाने हे मोटारसायकलवरून गावाकडे जात असताना बस (क्रमांक एम.एच.१४.०१९७) ने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित बस पोलिस मुख्यालयात जमा करण्यात आली असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.
या दुर्घटनेमुळे काकडहिरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









